बिद्री '' साठी ६२४ अर्ज वैध ; ४२ अर्ज ठरले अवैध

बिद्री '' साठी ६२४ अर्ज वैध ; ४२ अर्ज ठरले अवैध

Published on

लोगो
...

बिद्री कारखान्यासाठी ६२४ अर्ज वैध

४२ अर्ज अवैधः अर्ज माघारीसाठी १७ नोव्हेंबरअखेर मुदत

बिद्री, ता. ३ : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये ४२ अर्ज अवैध ठरले तर ६२४ अर्ज वैध ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी आज निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी जाहीर केली. कारखान्यासाठी ३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत विक्रमी ८६२ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी कोल्हापुरातील निवडणूक कार्यालयात पार पडली. अर्जदार किंवा त्यांचे सूचक व अनुमोदक यांनी कारखान्याला ऊस पुरवठा न करणे, शेअर्स वर्गणी १५ हजार रुपये भरलेली नसणे, अन्य सहकारी संस्थेचे थकबाकीदार असणे आदी कारणांमुळे ४२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर ६२४ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत.
अर्ज माघारीसाठी १७ नोव्हेंबरअखेर मुदत असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यानच्या कालावधीत दिवाळी सण असल्याने राजकीय हालचाली थंडावणार आहेत. तर १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. त्यानंतर १६ व १७ या दोन दिवशी माघारीसाठी झुंबड उडणार आहे. इच्छुकांची संख्या पाहता पॅनेल करताना प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार असून माघारीसाठी वेगवेगळ्या मार्गाने मनधरणी करावी लागणार आहे.
...

गटनिहाय वैध अर्ज संख्या (कंसात अवैध अर्ज)

उत्पादक गट राधानगरी क्र. १ - ५२ ( ०२ ), राधानगरी गट क्र. २ - ६४ ( ०३ ), कागल उत्पादक गट क्र. ३ - ५४ ( ०२ ), कागल उत्पादक गट क्र. ४ - ३० ( ०३ ), भुदरगड व्यक्ती गट क्र. ५ - ५६ ( ०१ ), भुदरगड उत्पादक गट क्र. ६ - ३५ ( ०६ ), करवीर उत्पादक गट क्र. ७ - २६ ( ०१ ), महिला राखीव १७१ ( १४ ), इतर मागास ८५ ( ०३ ), अनुसुचित जाती जमाती ३१ ( ०५ ), भटक्या जाती विमुक्त जाती वि. मा. प्रवर्ग २० ( ०२ ) .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.