बिद्री '' एफआरपी प्रमाणे प्रतिटन ३२०० रुपये ऊस दर देणार

बिद्री '' एफआरपी प्रमाणे प्रतिटन ३२०० रुपये ऊस दर देणार

Published on

02017

‘बिद्री’ एफआरपीप्रमाणे
प्रतिटन ३२०० रुपये देणार

के. एस. चौगले : गळीत हंगामाचा प्रारंभ

बिद्री ता. ३ : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यावर्षी गळीतास येणाऱ्या उसाला एफआरपीप्रमाणे विनाकपात प्रतिटन ३२०० रुपये दर देणार आहे. उत्पन्न विभागणी सूत्रानुसार होणारी वाढीव रक्कम देणेबाबत संचालक मंडळ निर्णय घेईल; अशी माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली.
कारखान्याच्या ६१ व्या हंगामाच्या प्रारंभी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक आर. डी. देसाई होते. यावेळी ज्येष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून प्रारंभ झाला. तत्पूर्वी के. एस. चौगले व पत्नी राधिका चौगले यांच्याहस्ते गव्हाणपूजन झाले. ऊसतोडणीचा प्रारंभ मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील व ऊस वजन काट्याचे पूजन वर्क्स मॅनेजर एस. बी. भोसले यांच्याहस्ते झाले.
चौगले म्हणाले, ‘यावर्षी १० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून हंगामपूर्व मशिनरी देखभाल दुरुस्ती व तोडणी यंत्रणेचे नियोजन केले आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसाठीचे करार पूर्ण झाले असून तोडणीच्या ३७५ कायमस्वरुपी टोळ्या बांधल्या आहेत. ६०० स्थानिक ऊसवाहतूक वाहनांची उपलब्धता आहे. सभासदांनी ऊस पाठवून सहकार्य करावे.’
यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर, सचिव एस. जी किल्लेदार, चिफ अकौंटट एस. ए. कुलकर्णी, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर, चिफ केमिस्ट पी. पी. शिंदे, कामगार अधिकारी शिवराज मोरे, अभियंता बी. बी. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळेंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश घोरपडे यांनी तर एस. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.