मजरे कासारवाडा ग्रामस्थांकडून ‘हुमणीमुक्त गाव’ निर्धार यशस्वी

मजरे कासारवाडा ग्रामस्थांकडून ‘हुमणीमुक्त गाव’ निर्धार यशस्वी

02384
कासारवाडा : येथे कृषी विभागाने राबविलेल्या ‘हुमणीमुक्त गाव’ उपक्रमावेळी उपस्थित सरपंच युवराज वारके, जिल्हा कृषी अधिकारी भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे आदी.

..........
मजरे कासारवाडा ग्रामस्थांकडून
‘हुमणीमुक्त गाव’ निर्धार यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १५ : राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील ४० शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्रित येत गाव ‘हुमणीमुक्त’ करण्याचा संकल्प करून तो सत्यात उतरविला आहे. याला गावचे सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज वारके, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक यांची मोलाची साथ लाभली.
आत्मा, कृषी विभाग व कृषी महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या या उपक्रमाला जिल्हा कृषी अधिकारी भिंगारदिवे यांनी भेट दिली. या उपक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांनी दिलेली साथ निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट, नवी दिशी देणारी असून, याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन भिंगारदिवे यांनी केले.
यावेळी सरपंच युवराज वारके, आत्मा कमिटी सदस्य सचिन वारके, उपसरपंच अरुण वारके, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, पर्यवेक्षक दिलीप आद‌मापुरे, सहायक अमोल कांबळे, प्रदीप गोगाने, जयदीप पाटील, युवराज सावंत, सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुहास वारके, विक्रम वारके, मनोज खोत, सुनील वारके, दिगंबर जितकर, सुधीर वारके, सुनील जितकर, अनिल वारके यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com