दिवसा उघडीप, रात्री रिपरिप; पावसाच्या जोरदार सलामीने शिवारात पाणीच पाणी

दिवसा उघडीप, रात्री रिपरिप; पावसाच्या जोरदार सलामीने शिवारात पाणीच पाणी

Published on

लोगो बिद्री परिसर

दिवसा उघडीप, रात्री रिपरिप;
बिद्री : चार दिवसांत तर पावसाने चांगलाच जोर धरला असून, दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे. दिवसभर उसंत घेणारा पाऊस रात्री रुद्र रूप धारण करत असून, या पावसाने शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला अडखळणारा मॉन्सून शेवटच्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झाला. गेले पंधरा दिवस पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने भात, नाचणी, सोयाबीन, भुईमूग या पिकांसह ऊस पिकालाही जीवदान मिळाले आहे. चांगल्या पावसाने सर्वत्र शेतीच्‍या कामांची धांदल उडाली असून, डोंगराळ भागात हिरवा चारा उगवल्याने सर्वत्र हिरवेगार दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.