

2741
.................
जिल्ह्यात आठशे टॉवरवर
वीजरोधक यंत्रे कार्यान्वित
मॉन्सूनपूर्व-पश्चात काळजी घेण्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १७ : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत वीज पडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेल्या आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे आठशे मोबाईल टॉवरवर वीजरोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत. येणाऱ्या वर्षात जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘एमआरडीपी’अंतर्गत उर्वरित टॉवरवर वीजरोधक यंत्रे बसवली जाणार आहेत.
मॉन्सूनपूर्व मे आणि जून या सुरुवातीच्या कालखंडात तसेच मान्सूनपश्चात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. शहरासह ग्रामीण भागात वीज पडून दुर्घटना होण्याच्या घटना घडतच असतात. या काळात वीज पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जिल्ह्यातील आठशेहून अधिक मोबाईल टॉवरवर वीजरोधक यंत्रे बसविलेली आहेत.
वीजरोधक यंत्रामुळे यंत्राच्या ठिकाणापासून दोन किलोमीटरच्या आत वीज पडत नाही. हे यंत्र पडणारी वीज खेचून घेते अथवा वीज पडण्याच्या क्षमतेचीही माहिती करून देते. जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी अशी यंत्रे बसविण्याचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात उर्वरित सर्व मोबाईल टॉवरवर वीजरोधक यंत्रे बसवली जाणार आहेत.
...
कोट...
विजा चमकत असताना घराबाहेर असाल तर पायांव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीशी स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतात काम करणाऱ्यांनी कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. लोखंडी वस्तूला हात लावू नये, तसेच झाडाखाली उभे राहू नये.
प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.