रक्तदान शिबिरातून  वाहिली आदरांजली

रक्तदान शिबिरातून वाहिली आदरांजली

Published on

सर्पमित्राला रक्तदान शिबिरातून
वाहिली स्मृतिदिनी आदरांजली

उंदरवाडीत ९० जणांनी केले रक्तदान

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १३ : उंदरवाडी, बोरवडे, सरवडे परिसरात ‘काका’ या नावाने ओळखले जाणारे सर्पमित्र व प्राणिमित्र शशिकांत शंकर चव्हाण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उंदरवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ९० जणांनी रक्तदान करून चव्हाण यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली.
उंदरवाडी (ता. कागल) येथील शशिकांत चव्हाण यांचे वर्षभरापूर्वी अपघाती निधन झाले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ‘काका’ नावाने परिचित असलेल्या चव्हाण यांनी कित्येक सर्पांना आणि जखमी प्राण्यांना जीवनदान दिले होते. माणसांप्रमाणेच मुक्या प्राणी-पक्ष्यांना लळा लावलेल्या चव्हाण यांची अचानक झालेली एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून गेली.
त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी ग्रामस्थांनी एकत्र येत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडलेल्या शिबिरात ९० जणांनी रक्तदान केले. यावेळी मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक मसू पाटील, सरपंच संजीवनी पाटील, एस. के. पाटील, योगेश मस्कर, सुकुमार पाटील, समरजित पाटील, नीलेश मस्कर आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com