ध्येय निश्चिती, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

ध्येय निश्चिती, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

Published on

2926
बिद्री : येथील भारतमाता हायस्कूलमध्ये ‘यशाचा मूलमंत्र’ या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना प्रा. अतुल कुंभार. शेजारी मुख्याध्यापक एस. पी. पाटील.
............

आत्मविश्वास हीच यशाची
गुरुकिल्ली : प्रा. कुंभार

बिद्री ता. १६ : ‘जीवनात यशस्वी होण्यासाठी अगोदर ध्येयनिश्चिती होणे आवश्यक असते. त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असावी लागते. पहिल्याच वेळी यश येईल असे नाही. त्यामुळे अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवावे. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, लेखक प्रा. अतुल कुंभार यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील भारतमाता हायस्कूलमध्ये आयोजित ‘यशाचा मूलमंत्र’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. पी. पाटील होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील म्हणाले, ‘शाळेत शिकलेल्या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग जगात वावरताना विद्यार्थी कसा करतो यावरच त्याचे व्यक्तिमत्त्व घडते. गुणांसाठी अभ्यास न करता गुणवत्तेसाठी अभ्यास करावा, म्हणजे आदर्श नागरिक घडविण्यास मदत होईल.’
यावेळी सी. डी. कुंभार, एम. जी. फराकटे, टी. आर. पाटील, जी. ए. डिगरे, एस. एस. फराकटे, व्ही. आर. कुंभार, एस. एस. माजगावकर, एस. एम. पाटील, आर. व्ही. चौगले, व्ही. डी. वारके, सतीश चव्हाण, अनिल कांबळे, राजेंद्र वारके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com