

पोलिसाचा फोटो वापरणे...
..............
मुदाळ तिट्ट्यावर पोलिस चौकी
सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. ४ : पुणे-स्वारगेट एसटी बसस्थानकावर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने रात्री प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षितता चर्चेत आली आहे. राधानगरी, भुदरगड, कागल या तीन तालुक्यांचे प्रवेशद्वार असलेल्या मुदाळ तिट्टा येथे रात्री उतरणारे अनेक प्रवासी असतात. येथे दिवसा मोठी वर्दळ असली तरी रात्री अकरानंतर शुकशुकाट असतो. त्यामुळे रात्री महिलांसाठी हे ठिकाण असुरक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
राधानगरी-निपाणी व कोल्हापूर-गारगोटी हे दोन मार्ग मुदाळ तिट्टा येथे जोडले जातात. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. अनेक प्रवासी सोयीच्या गाडीने मुदाळ तिट्टा येथे उतरून दुसऱ्या गाडीने जातात. मुदाळ तिट्टा येथे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे आहेत. तसेच पतसंस्था, बॅंका, कार्यालये आहेत. दिवसा या ठिकाणी मोठी वर्दळ असते. मात्र, रात्री मुक्कामाला राहणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत शांतता असते.
रात्रीच्या वेळी या विभागातील पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अन्य ठिकाणाहून येणारे प्रवासी मुदाळ तिट्टा येथे उतरून खासगी वाहनाने आपल्या गावी जातात. रात्री दहानंतर एसटी बससेवा नसल्याने बाहेरगावी कामासाठी गेलेल्या लोकांची गैरसोय होते. या ठिकाणी उतरल्यावर कोणीही नसते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः या ठिकाणी महिला प्रवाशी उतरले तर त्यांच्या सुरक्षेसाठी ठिकाण नाही. त्यामुळे गैर प्रकार घडू शकतो. पुण्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी जर महिलांवर अत्याचार होत असेल तर अशा निर्जन ठिकाणी काहीही घडू शकते. प्रवांशाची सुरक्षितता म्हणून पोलिस प्रशासनाने गांभीर्य घेऊन या ठिकाणी पोलिस चौकी सुरू करावी व ती रात्रभर सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.