बिद्री मेकॅनिकल असो.तर्फे मोफत दुचाकी सेवा

बिद्री मेकॅनिकल असो.तर्फे मोफत दुचाकी सेवा
Published on

3025
बिद्री : बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त येथील मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने दुचाकींची मोफत दुरुस्ती करताना सदस्य.
.........
बिद्री मेकॅनिकल असो.तर्फे मोफत दुचाकी सेवा
बिद्री : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा यांच्या भंडारा उत्सवानिमित्त बिद्री (ता. कागल) येथील बिद्री मेकॅनिकल असोसिएशनच्यावतीने मोफत दुचाकी दुरुस्ती कॅम्पचे आयोजन केले होते. दिवसभरात सुमारे ७० हून अधिक दुचाकी चालकांनी याचा लाभ घेतला. कोल्हापूर, भोगावती, कागल येथून बिद्रीमार्गे आदमापूरला भंडारा यात्रेला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या कॅम्पचे आयोजन केले होते. मोफत दुरुस्तीसह दुचाकीसाठी लागणारे आवश्यक स्पेअर पार्टही यावेळी सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आले होते. कॅम्पमध्ये शिवाजी पोवार, बंडोपंत मेटील, सुरेश पाटील, साताप्पा चौगले, श्रीकांत फराकटे, संदीप कुंभार, दिगंबर साठे, अजित पाटील, मानसिंग पाटील, रविराज पाटील, संतोष खोत, नेताजी पाटील, प्रशांत साबळे, उत्तम पाटील यांनी मोफत सेवा केली. या सुविधेचा लाभ घेतलेल्या दुचाकीचालकांनी असोसिएशनच्या सदस्यांचे आभार मानत उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com