मेंढपाळाने घेतला स्मशानभूमीचा आधार

मेंढपाळाने घेतला स्मशानभूमीचा आधार

Published on

3137
सोनाळी (ता. कागल) : येथील स्मशानभूमीत पावसामुळे आसरा घेतलेल्या मेंढपाळाची बकरी.
.......
मेंढपाळाने घेतला स्मशानभूमीचा आधार

पावसामुळे हवालदिल ः जेवण आणि मुक्कामही स्मशानातच

दत्तात्रय वारके ः सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. २७ : गेले आठ-दहा दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याचा फटका भटकंती करणाऱ्या धनगर बांधवांनाही बसला असून, आभाळच फाटले तर ठिगळ लावायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सोनाळी (ता. कागल) येथे एका मेंढपाळाने मेंढ्यांचा पावसापासून बचाव करण्यासाठी चक्क स्मशानभूमीचा आधार घेतला आहे. येथेच त्याने तीन दगडांची चूल मांडून जेवण आणि रात्रीचा मुक्काम केला.
ओल्या चाऱ्याच्या शोधात ऑक्टोबर महिन्यात कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात मेंढपाळ बांधव कुटुंबासह दाखल होतात. पुढील सुमारे आठ महिने भटकंती करून जून महिन्यात पाऊस सुरू होताच ते माघारी फिरतात. परंतु यंदा मे महिन्याच्या मध्यावरच पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांसोबतच या मेंढपाळांचेही नुकसान झाले आहे. गेले आठ-दहा दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे माळरानावर बनविलेल्या त्यांच्या झोपडीत पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे कपडे, भांडीकुंडी, धान्यादी माल अशा जीवनावश्यक वस्तू भिजल्याने मेंढपाळ अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधावा लागला.
कागल तालुक्यातील सोनाळी येथे भटकंती करत आलेल्या एका मेंढपाळाने चक्क स्मशानभूमीतच आपला संसार थाटला आहे. पावसापासून मेंढ्यांचे रक्षण व्हावे यासाठी त्याने त्यांना स्मशानभूमीसमोरच्या मंडपात थांबविले आहे. तर याच स्मशानभूमीत जेवण बनविले जात असून, हे कुटुंब रात्री स्मशानात झोपत आहे.
मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत थांबलेल्या मेंढपाळाच्या या कुटुंबाला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यांच्याबद्दल येणारे-जाणारेही हळहळ व्यक्त करत आहेत. परंतु कोणताच पर्याय नसल्याने हे कुटुंब येथे थांबले असून, पाऊस कधी थांबणार याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com