निगवे दुमाला येथील धोकादायक पूल . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगवे दुमाला येथील धोकादायक पूल .
निगवे दुमाला येथील धोकादायक पूल .

निगवे दुमाला येथील धोकादायक पूल .

sakal_logo
By

01195
निगवे दुमालातील पूल बनलाधोकादायक
भुये: निगवे दुमाला (ता. करवीर) येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे ओढ्यावरील पूल धोकादायक बनला आहे. हा मार्ग वडणगे ते शिये राज्य महामार्गाला जोडला असल्यामूळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. वडणगे, निगवे, भुयेवाडी, भुये, जठारवाडीतील वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. पूलाच्या मधोमध खड्डे पडले आहेत. त्यामुळे उसाने भरलेले ट्रॅक्टर व ट्रक खड्ड्यामध्ये अडकतात. वाहनामध्ये जास्त ऊस भरल्यामुळे पुढचे चाक उचलले जाते व ट्रॅक्टर किंवा ट्रक पुलाच्या खाली पलटी होऊन जाण्याची शक्यता आहे. दोन चाकी वाहने धोक्याचे आहे. रात्रीच्या वेळी कसरत करून गाडी चालवावी लागते. त्यामूळे मधोमध पडलेल्या खड्यामूळे गाडी पलटी होऊन पूलात जाण्याची शक्यता आहे. गेली सहा महिने आम्ही रात्रीच्या वेळी कसरत करून जीव मुठीत घेऊन गाडी चालवत आहे. पुलाला कठडे नसल्यामूळे कोणत्याही क्षणी अपघात होईल सांगता येत नाही, असे भुये येथील संजय पाटील यांनी सांगितले.