केर्ली येथे रोपांचे वाटप

केर्ली येथे रोपांचे वाटप

केर्ली येथे रोपांचे वाटप
भुये, ता. १४ : केर्ली (ता. करवीर) येथील बाळूमामा वृक्षारोपण संस्थेतर्फे अक्षय तृतीया भंडारानिमित्त अन्नसाखळी निर्माण करणाऱ्या रोपांचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण, भजन, प्रवचनासह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी केर्लीच्या सरपंच व विजयमाला बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते कर्पुरातुळस, रान तुळस, कढीपत्ता, चिकू, पेरू, आंबा, सिताफळ, गरडलिंब अशा अन्नसाखळी निर्माण करणाऱ्या वृक्षांची रोपे वाटण्यात आली. यावेळी पंडित माने यांनी गेल्या २१ वर्षांत अन्नसाखळी निर्माण करणाऱ्या लाखो वृक्षांचे वाटप केल्याबद्दल त्यांचा सत्कार कुबेर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृक्षमित्र पंडित माने, सुनीता माने, नवनाथ माने, भगवान माने, सुप्रिया भोसले, अलका कदम, भाऊसो चव्हाण, आप्पा पुजारी यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com