पाऊस आला धाऊन रस्ता गेला वाहून . भुये ते कसबा बावड्याची अवस्था

पाऊस आला धाऊन रस्ता गेला वाहून . भुये ते कसबा बावड्याची अवस्था
Published on

01875
पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून
भुये -कसबा बावड्याची मार्गाची अवस्था; पिकांचेही नुकसान

भुये, ता. २५ : भुये (ता. करवीर) येथील भुये ते कसबा बावडा रस्त्याचे काम संभगतीने सुरू आहे. तसेच नाले नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरू थेट शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले.
भुये-कसबा बावडा मार्ग भुये, भुयेवाडी, जठारवाडी, शिये, सादळे- मादळे, कुशिरे, निगवे या लोकांना जवळचा आहे. २००० पासून रस्त्याला डांबर लागले नव्हते. परंतू रस्त्याचे काम दोन ते तीन महिने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक शेतकऱ्यांची होती. येथे सांडपाणी जाण्यासाठी नाल्यांचीही व्‍यवस्था नाही. नाल्याअभावी पावसाचे पाणी रस्तयावर आले. पाण्याला जायला मार्ग नसल्यामुळे सगळे पाणी शेतामध्ये तुंबून राहिले. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतात दहा दिवसांपूर्वी श्रावण घेवड्याची लागवड केली होती. शेतकरी दिनकर पाटील भुयेकर व शंकर पाटील भुयेकर यांनी ठेकेदाराला वारंवार सांगूनदेखील नाल्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे एक एकर क्षेत्रातील श्रावण घेवडा खराब होण्याच्या मार्गावर आहे. लागवडीसाठी ८० हजार रुपये खर्च झाला आहे. नुकताच फुलाच्या अवस्थेमध्ये पीक आले आहे. तोपर्यंत पाण्याने कुजून जाण्याचा मार्गावर आहे. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी दिनकर पाटील भुयेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com