पोलिस वृत्त: बाजार भोगाव : मुगडेवाडी येथे जमीन व घराच्या वादातून भांडण, ऍट्रॉसिटी दाखल , परस्पर विरोधी फिर्यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त: बाजार भोगाव :  मुगडेवाडी येथे जमीन व घराच्या वादातून  भांडण, ऍट्रॉसिटी दाखल ,  परस्पर विरोधी फिर्यादी
पोलिस वृत्त: बाजार भोगाव : मुगडेवाडी येथे जमीन व घराच्या वादातून भांडण, ऍट्रॉसिटी दाखल , परस्पर विरोधी फिर्यादी

पोलिस वृत्त: बाजार भोगाव : मुगडेवाडी येथे जमीन व घराच्या वादातून भांडण, ऍट्रॉसिटी दाखल , परस्पर विरोधी फिर्यादी

sakal_logo
By

मुगडेवाडी येथे जमीन, घराच्या
वादातून परस्परविरोधी फिर्यादी

बाजारभोगाव, ता. ६ : किसरुळपैकी मुगडेवाडी (ता. पन्हाळा) येथे शेतजमीन व त्यातील घरासंदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच वादग्रस्त जागेत शेड उभारण्याच्या कारणावरुन वादवादी तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तर आडकाठी करणाऱ्यास मारहाण करून त्याच्याकडील चाळीस हजारांची रोकड लंपास करण्यात आली. याबाबत एकावर ॲट्रॉसिटी तर पाच जणांवर लोखंडी गज व काठीने मारहाण अशा परस्परविरोधी फिर्यादी पोलिसांत दाखल झाल्या आहेत.
कळे पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तेलवे (ता. पन्हाळा) येथील शामराव आबा पाटील यांची किसरुळपैकी मुगडेवाडी येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. ही जमीन कसण्यासाठी त्यांच्या वाडवडिलांनी श्रीपती माळवी (रा. किसरुळपैकी मुगडेवाडी) यांना शेतगडी म्हणून कामास ठेवले होते. याच जमिनीत माळवी यांच्या नावे नोंद असलेले घर आहे. जमीन आणि घरावरून पाटील व दिनकर श्रीपती माळवी यांच्यातील खटला कळे न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, दिनकर माळवी हे घराशेजारी शेड उभारत असताना पाटील यांनी त्यांच्याशी वादावादी करत
धक्काबुक्की केली. तसेच माळवींच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याचवेळी पाटील यांना लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख चाळीस हजार रुपये आणि सोन्याची चेन काढून घेतल्याप्रकरणी दिनकर माळवी, त्यांची पत्नी रंजना, मुलगा अक्षय, दोन मुली यांच्यासह मुंबईस्थित भाऊ सरदार व विष्णू यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.