कासारी मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा

कासारी मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा

Published on

04984
...
कासारी मध्यम प्रकल्पात
४५ टक्के पाणीसाठा
प्रकल्पातून २५० क्युसेक विसर्ग : कासारी-जांभळी खोऱ्यात मुसळधार
सकाळ वृत्तसेवा
बाजारभोगाव, ता. ८ : येथील परिसरात पावसाने सोमवारी उघडीप दिली; पण कासारी व जांभळी खोऱ्यांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कासारी नदीस पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे गेळवडे (ता. शाहूवाडी) येथील कासारी प्रकल्प ४५ टक्के भरला आहे. या प्रकल्पामधून वीज निर्मितीसाठी २५० क्युसेक प्रतिसेकंद दराने कासारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पन्हाळा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सचिन लाड यांनी दिली आहे.
मुसळधार पावसाने ओढे, नाले भरून वाहत असून, कासारी व जांभळी नदीस पूर आला आहे. पुरामुळे कासारी नदीवरील पुनाळ, वाळोली, बाजारभोगाव, पेंडाखळे हे बंधारे दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहेत. पण, आज दिवसभर पावसाची उघडीप असल्याने करंजफेण ते कांटे दरम्यान रस्त्यावर आलेले पुराचे पाणी कमी झाल्याने आज दुपारपासून कोल्हापूर-बाजारभोगाव-राजापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.
कासारी धरण परिसरात एक जून ते आठ जुलैअखेर १३८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गतवर्षी आजअखेर ९६३ मिलिमीटर पाऊस झाला होता. कासारी धरणाची क्षमता २.७७ टीएमसी इतकी असून, सध्या धरणात १.२५ टीएमसी इतका साठा झाला आहे, तर कुंभवडे हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पडसाळी, पोंबरे नांदारी लघु प्रकल्प ९० टक्‍क्‍यांपर्यंत भरले आहे, तर केसरकरवाडी ७० टक्‍क्‍यांपर्यंत भरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.