बाजारभोगाव केंद्रात ४८८ विद्यार्थी परिक्षा देणार

बाजारभोगाव केंद्रात ४८८ विद्यार्थी परिक्षा देणार
Published on

बाजारभोगाव केंद्रावर
दहावीचे ४८८ विद्यार्थी 
बाजारभोगाव ः महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा विभागाच्यावतीने २१ फेब्रुवारीपासून  एसएससी (दहावी) च्या परीक्षा सुरू होत आहे. बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथे परीक्षा केंद्र आहे. सलग चौदा वर्षे कॉफीमुक्त केंद्र म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. येथे परीक्षा केंद्रात अकरा शाळांमधील ४८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमातून ३२१ तर सेमी माध्यमातून १६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रसंचालक म्हणजे आबासाहेब भोगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक यू. व्ही. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. आबासाहेब भोगावकर हायस्कूल बाजारभोगाव, साधना हायस्कूल पुनाळ, राजर्षी शाहू हाय. काटेभोगाव, संजीवनी हाय. पोहाळे तर्फ बोरगाव, न्यू इंग्लिश हाय. पोहाळे तर्फ बोरगाव, किसरुळ हाय. किसरुळ, श्री विनय कोरे हाय. काळजवडे, काळम्मादेवी हाय.मानवाड, (कै.) द. रा. पाटील हाय. पाटपन्हाळा, माध्यमिक विद्यालय माळापुडे, करंजफेण हाय. करंजफेण या शाळांचा समावेश आहे. बैठकव्यवस्था आबासाहेब भोगावकर हायस्कूलची इमारत, ज्युनिअर कॉलेजची इमारत व प्राथमिक शाळेची इमारतीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com