

02327
झरे जिवंत, पाणवठे खुले
वन्यप्राण्यांसाठी सोय; पन्हाळा वनपरिक्षेत्राचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
बाजारभोगाव, ता. १८ ः उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जंगल परिसरातील झरे आटू लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागते. ही अडचण ओळखून पन्हाळा वन विभागातील वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांनी जंगल परिसरातील नैसर्गिक पाणवठे, वनराई बंधाऱ्यामधील पालापाचोळा काढून स्वच्छता केल्याने झरे जिवंत झाल्याने पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची तहान भागत आहे.
वने आणि तेथील जैवविविधता व वन्यजीव ही राष्ट्रीय संपती आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येतात. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. यातून शेत पिकांचे नुकसान होते. रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांची भटकंती होते. वन विभागाने या मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. यासाठी पन्हाळा वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर हे वन्यप्राणीसाठी काळजीपूर्वक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जंगलात पालोपाचोळ्यात दडलेले झरे, पाणवठ्यावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, पन्हाळा परिक्षेत्र वनधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मानवाड वनपाल अतूल मगदूम, बाजारभोगाव वनपाल राजेंद्र रसाळ यांच्यासह वनरक्षक, वनमजूर यांची टीम यांनी श्रमदानातून जंगलात पालापाचोळ्यात बुजलेले झरे, पाणवठ्यावर स्वच्छता मोहीम राबवली.
कोट १
जंगलातील जिवंत झरे बंद पडले होते. तेथे स्वच्छता राबवून जिवंत केले आहेत. पाण्याची चांगली साठवणूक झाली आहे. दगडांनी बंदिस्त पाणवठे तयार केल्याने जंगलातच वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध झाल्याने भटकंती थांबण्यास मदत होत आहे.
- राजेंद्र रसाळ, परिमंडल वनाधिकारी, बाजारभोगाव
वनपरिक्षेत्र पन्हाळामार्फत जंगलात पाणवठे, वनबंधारे तयार केले आहेत. बीटनिहाय नैसर्गिक पाणवठे साफ करून वनपरिक्षेत्र हद्दीत जलसाठे निर्माण करण्यासाठी व भूगर्भातील जलसाठा वाढवण्यासाठी पाणवठे, बंधाऱ्यांची स्वच्छता व बशी आकाराची तळी निर्माण केली जात आहेत.
- अतुल मगदूम, वनपाल, मानवाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.