किसरुळ प्राथमिक शाळेस उमेद फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटफ
02602
उमेद फाउंडेशन, उल्का उद्योगमार्फत शैक्षणिक साहित्य
बाजारभोगाव ः उमेद फौंडेशन आणि उल्का उद्योगसमूह यांच्या संयुक्त विद्यमाने किसरुळ प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. बाजारभोगाव, काळजवडे परिसरातील ८४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप झाले. उमेद फौंडेशन दरवर्षी जिल्ह्यातील ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवते. उच्च शिक्षणासाठी दरवर्षी ३ लाख शिष्यवृत्ती दिली जाते. दिवाळी फराळ, करिअर मार्गदर्शन, पथनाट्य, महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण व रोजगाराची संधी, तसेच अनाथ व एक पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘उमेद मायेचं घर’ उपक्रमांतर्गत मोफत वसतिगृह व शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात. यावेळी मुख्याध्यापक मारुती पाटील, राजू खाडे, दिलीप वाळवेकर, नंदकिशोर घोगरे, मधुकर गोपनर, संतोष खटे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

