

ग्रामीण लोककलाकारांचे प्रश्न
सोडवण्यासाठी प्रयत्नशील : खोत
बाजारभोगाव ः ‘‘ग्रामीण लोककलाकारांचे पन्नाशीनंतरचे जीवन खडतर असून शासनाकडून अपेक्षित मानधन अनेकांना मिळत नाही. करवीर मतदारसंघातील कलाकारांचे प्रश्न आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे आश्वासन पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत यांनी दिले. येथील शिवतेज मंगल कार्यालयात श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ व शाहीर रामचंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला महोत्सव झाला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी तानाजी कुऱ्हाडे व जयवंतराव वायदंडे यांनी कलाकारांच्या समस्या मांडत मानधन वाटपातील बनावटगिरी थांबवण्याची मागणी केली. विविध मागण्यांचे निवेदन खोत यांना देण्यात आले.कार्यक्रमात अनेक लोक कलाकार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.