बांबवडे

बांबवडे

Published on

02045
...
रस्त्यात सापडलेले
लाख रुपये प्रामाणिकपणे परत


बांबवडे, ता.१०ः कापशी (ता. शाहूवाडी) येथील संजय नामदेव वारुळकर यांनी रस्त्यात सापडलेले एक लाख रुपये प्रामाणिकपणे परत केले. याबाबतची अधिक माहिती अशी, आज सकाळी युवराज समुद्रे हे एका राष्टीयीकृत बँकेचे कर्मचारी बँकेमधून पैसे काढून मालेवाडी येथील बँकेच्या शाखेत घेऊन जात होते. कापशी येथील जामदार गुरुजींच्या मठाजवळ त्यांच्या बॅगेची चेन निघाल्याने बॅगेतील दहा हजारांचे दहा बंडल रस्त्यावर पडले. दरम्यान, संजय वारुळकर हे त्याच रस्त्यावरून जात असताना त्यांना हे बंडल सापडले. त्यांनी हे पैसे आपल्या जवळ ठेवले व तेथेच अर्धा तास थांबले.
दरम्यान, शिवारे येथे युवराज समुद्रे यांना लोकांनी बॅगेची चेन निघाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी बॅगेतील रक्कम तपासली असता एक लाख रुपये पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. परत मागे येत रस्त्यावरील लोकांना एक लाख रुपये सापडलेत का, याबाबत त्यांनी विचारणा केली. कापशीजवळ आले असता, त्यांना वारुळकर हे रस्त्यावर उभे असलेले दिसले. समुद्रे यांनी त्यांना पैसे सापडलेत का विचारले असता वारूळकर यांनी संबंधित रक्कम पडल्याची खात्री करुन त्यांना एक लाख रुपये परत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.