बांबवडे

बांबवडे

Published on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
नेतृत्वाखाली काम करणार

मानसिंगराव गायकवाडः सत्यजित पाटील यांच्याशी असलेली युती कायम

बांबवडे, ता. १०ः ‘तालुक्यातील जनतेचे प्रश्न व समस्या सोडविणे हाच माझ्या राजकारणाचा हेतू आहे. त्यासाठी सत्तेच्या बाजूने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांसाठी त्यांच्यासोबत राहणार आहे,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केली.
बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गायकवाड म्हणाले ,‘ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना व ज्येष्ठ नेतेमंडळींना विचारात घेऊन मी ही भूमिका घेत आहे. जिल्ह्यातील राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम करण्याचे ठरले आहे. आज जिल्हा बँक व बाजार समितीमध्ये तालुक्याचे नेतृत्व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आहे. तालुक्याच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांच्या विरोधातच राहणार आहे. आमची माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याशी असलेली युती यापुढेही अभेद्यच राहील. भविष्यात रणवीरसिंग गायकवाड यांना निवडणूक लढविण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली तर विजयाची खात्री असेल तरच उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याचा विचार केला जाईल.’
यावेळी ज्येष्ठ संचालक महादेवराव पाटील, पंडित शेळके, अजित पाटील, भगवान पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.