Tue, March 28, 2023

मोहरेत मगरीच्या वावर ;शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मोहरेत मगरीच्या वावर ;शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Published on : 9 February 2023, 6:07 am
02144
मोहरेत मगरीचा वावर
बोरपाडळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथील वारणा नदीकाठावरील शेळके-मळी नावाच्या भागामध्ये काही शेतकऱ्यांना मगर दिसल्याने
ऊसतोडणी कामगारांसह नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. राहुल शेळके यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू आहे. दुपारी ऊसतोड मजूर
पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठावर गवत-झुडपांमध्ये मगर दिसली. मगर असल्याची त्यांनी खात्री करण्यासाठी दगड मारल्यानंतर
मगर निघून गेली. वारंवार सातवे, काखे, सावर्डे आणि मोहरे परिसरात मगरीचे दर्शन होत आहे. नदीकाठावरील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे.