12 वी निकाल  खडके ॲकॅडमी बोरपाडळे कॉलेजचा 100 टक्के निकाल

12 वी निकाल खडके ॲकॅडमी बोरपाडळे कॉलेजचा 100 टक्के निकाल

बोरपाडळे कॉलेजचा १०० टक्के निकाल
बोरपाडळे : १२ वीच्या परीक्षेत श्री. आर. आर. खडके अकॅडमी संचालित पन्हाळा व्हॅली ज्युनियर कॉलेज आणि क्रांती ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, बोरपाडळे (ता. पन्हाळा) यांचा सलग ८ व्या वर्षी १०० टक्के निकाल लागला. यामध्ये संस्कार अशोक पडवळ ७०.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आला. अभय प्रमोद पाटील ७० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर वहिदा सलिम मुल्ला हिचा ६८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक आला. विद्यार्थ्यांना संस्थापक प्राचार्य अविनाश खडके, प्राचार्या क्रांती खडके, मार्गदर्शक रघुनाथ खडके, उपप्राचार्या अयोध्या पाटील, रश्मी पोवार, पालक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र चौगुले, धनंजय कुलकर्णी, मुरलीधर लोहार, तेजस्विनी पाटील, अश्विनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com