प्रामाणिकसेवेचे फळ यशाबरोबर समाधान देणारे - उत्तम पाटील ;  सोळसे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

प्रामाणिकसेवेचे फळ यशाबरोबर समाधान देणारे - उत्तम पाटील ; सोळसे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Published on

02498
सोळसे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
बोरपाडळे : कोणतेही कार्य प्रामाणिकपणे केल्यास मिळणारे समाधान पुरस्कारापेक्षा मोठे असते. नोकरीतील कार्याचा ठसा जनमानसांत दिसावा. त्यादृष्टीने प्रत्येकाने प्रयत्त्न करावेत, असे प्रतिपादन बॅंक निरीक्षक उत्तम पाटील यांनी केले. ते माले (ता. पन्हाळा) येथील पन्हाळा तालुका वृत्तपत्र विक्रेते एजंट संघटनेचे अध्यक्ष आणि बहिरेवाडीतील सेवा सोसायटीचे सचिव सदाशिव सोळसे यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कारावेळी बोलत होते. केडीसीसी शाखा वारणानगर व विकास सेवा संस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. बाबासाहेब सामुद्रे यांनी प्रास्ताविक केले. ४२ वर्षे विविध सहकारी संस्थांमध्ये सचिव तसेच लेखापरीक्षणाचे पारदर्शी कामकाज करीत ते इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे मत शाखाधिकारी तानाजी पवार यांनी व्यक्त केले. निरीक्षक शशिकांत पाटील, विलास गायकवाड, भगवान पाटील, नामदेव चौगले, अनिल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी कोडोली शाखेचे निरीक्षक भास्कर कुराडे, संगणक तंत्रज्ञ शाम पवार, अतुल पेटकर, सचिव सागर नरुटे, दीपक जाधव, मानसिंग चव्हाण, बाजीराव मोहिते, वसंत मोहितेंसह सचिव व कर्मचारी उपस्थित होते. तानाजी गिरवे यांनी सूत्रसंचालन, सुभाष इंगवले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.