बोरपाडळे परिसरात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल

बोरपाडळे परिसरात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल

Published on

02500
बोरपाडळेत परिसरात पेरणीसाठी धांदल
बोरपाडळे : नेहमीपेक्षा यावर्षी पावसाने खूप मोटी दडी मारली. जून संपत आल्यांनतर पावसाने सुरुवात केली आहे. मात्र जून महिन्यात पाऊस नसल्याने बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले, मिठारवाडी, काखे आदी परिसरातील सोयाबीन, भुईमूग पिकांची पेरणी खोळंबली होती. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतशिवारामध्ये सगळीकडे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेती फुलून गेली आहे. उघडिपीचा मोका उठवत पेरणीची संधी साधत आहेत. सध्या मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहापूर, माले जाफळे, मिठारवाडी आमतेवाडी शिंदेवाडी गावातील शेतकरी बी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.