महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा : चित्रा वाघ

महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा : चित्रा वाघ

02965
बोरपाडळे : येथे संजीवनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.


महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा
चित्रा वाघ : ‘संजीवनी’तर्फे बोरपाडळेत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. १० : महिलांना सक्षम व त्यांच्यात आमूलाग्र बदल करणारे सध्याचे सरकार आहे. महिला सशक्तीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.
बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा शौमिका महाडिक होत्या. सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असणाऱ्या पाटील परिवाराचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे महाडिक यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्था सचिव डॉ. स्वाती दीपक पाटील यांना भाजप राज्य महिला प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पन्हाळा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील यांनी स्वागत केले. महिलांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले. यात परिसरातील महिलावर्गांनी सहभाग घेतला. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, अजय चौगुले यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कृष्णराज महाडिक, के. एस. चौगुले, परिसरातील तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संजीवनी फाउंडेशनच्या आयुर्वेद व नर्सिंग कॉलेजने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. पराग कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य नितीन ताटपुंजे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com