बोरपाडळेसह परिसरात शेतीच्या कामांना वेग

बोरपाडळेसह परिसरात शेतीच्या कामांना वेग

बोरपाडळेसह परिसरात
शेतीच्या कामांना वेग
बोरपाडळे, ता. १० : बोरपाडळेसह परिसरात शेतीतील मशागतीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. शहापूर, माले, मोहरे, काखे, पोखले आदी ऊसप्रवण क्षेत्रामध्ये उसातील भांगलण, पाला काढणे शिवाय ऊस भरणी अंतिम टप्प्यात दिसून येत आहे.
येथील काही कोरडवाहू तसेच खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरट, कुलवट, फणकटणे, बांध घालणे, सड वेचणे, रोटावेटर करणे, खत ओढणे, खत विस्कटणे आदी कामांना ऊत आल्याचे दिसत आहे. मिठारवाडी, आंबवडे, जगदाळेवाडी, दाणेवाडी, जाफळे तसेच डोंगराळ भागामध्ये अजूनही काही शेतकरी बैलाच्या औताद्वारे मशागत करत आहेत. उन्हाचा कडाका असल्याने शेतकरी सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ पर्यंत कामासाठी शेतामध्ये जात आहे. सकाळची अर्थातच एकपारखी भांगलणीवर मजूर भर देत आहेत. कडक उन्हामुळे दिवसभर शेतात थांबणे शक्य होत नाही. सकाळी १२ पर्यंतच काम करणे मजुरांना सोयीस्कर वाटते. आजारी मजुरांनी उन्हापासून काळजी घ्यायला हवी. भरपूर पाणी प्यायला हवे; असे शामराव आमकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com