वाघबीळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

वाघबीळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

वाघबीळमधील मोफत
आरोग्य शिबिरास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. ३ : कोरोना काळात बोरपाडळे व परिसरातील रुग्णांची सेवा निःस्वार्थीपणे व निडरपणे केली. या काळात रुग्ण व डॉक्टर असा भेदभाव न ठेवता आरोग्यसेवा दिली. ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये खूपच धन्यता वाटते. त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ मिळतो, असे प्रतिपादन आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष सुतार यांनी केले.
ते श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल फाऊंडेशन, बोरपाडळेतर्फे वाघबीळ येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिर व समर्थ ऑर्थो स्पाईन अँड पेन मॅनेजमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, हाडाचे विकार, जनरल तपासण्या, शुगर, ईसीजी आदी तपासण्या मोफत केल्या. विविध रोगांवर उपचार आणि मार्गदर्शन झाले. यामध्ये ॲपल सरस्वती हास्पिटल कोल्हापूर, श्री. टेके आय क्लिनिक सांगली तसेच श्री समर्थ हॉस्पिटल बोरपाडळेच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला. मणका, मान, कंबर व पाठदुखी तसेच हाडांच्या समस्येवर ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपीसह आयुर्वेदिक, हर्बल कायरोप्रॅक्टिक उपचारांबाबत उद्बोधन झाले. बोरपाडळेसह राक्षी, पन्हाळा, नेबापूर, आंबवडे, जगदाळेवाडी परिसरातील ५० ते ५५ रुग्णांनी लाभ घेतला. डॉ नितीन जाधव, समर्थ फाऊंडेशन व व्यसनमुक्तीचे प्रदीप कुंभार, जोतिराम सुतार यांच्यासह ॲपल सरस्वती हॉस्पिटल व टेके आय क्लिनिक सांगलीचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ. साक्षी सुतार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com