सांस्कृतिक स्पर्धेत कराओके''ची एंट्री
03443
शालेय सांस्कृतिक स्पर्धेत
आता ‘कराओके’ची एंट्री
प्रशासनालाही भुरळ; स्थानिक कलावंतांच्या हाताला विश्राम
सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. ११ : सध्या शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक केंद्रस्तरीय स्पर्धा जिल्ह्यात सुरू आहेत. यावर्षी शालेय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रथमच नव्यानेच ''कराओके'' साऊंडट्रक सिस्टीमचा वापर होणार आहे. नव्या आधुनिक बदलत्या यंत्रणेनुसार प्रशासनालाही ‘कराओके’ने भुरळ घातल्याची चर्चा आहे. यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांना सोयीस्कर झाल्याचे बोलले जात आहे. ट्रॅकवर गाणी गाण्याचा सध्या सर्वांनाच मोह असून यामध्ये विद्यार्थ्यांना गायनाची संधी मिळणार असल्याचे समाधान विद्यार्थ्यांसह आणि शिक्षकांमध्ये दिसत आहे.
यामध्ये वेळेची, पैशांची बचत होणार असली तर ग्रामीण भागातील कलाकारांना या शालेय सांस्कृतिक स्पर्धांपासून वंचित राहावे लागणार आहे. यामध्ये ढोलकी, सूरपेटी, तबला, कीबोर्ड वादक आदींच्या सुपाऱ्या कमी होण्याची चिन्हे आहेत. शाळेतील सुरपेटीसह अन्य साहित्याचाही फारसा वापर होणार नाही. बदलत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांबरोबर प्रशासन बदलत आहे.
कोट-
अनेक वर्षांपासून सांगितिक स्पर्धेसाठी ढोलकी, संबळवादन केले आहे. कराओकेमुळे संगीतसाथीसाठी कोणाचाही कॉल आला नाही. मिळणारे तुटपुंजे मानधनही बंद झाले.
-आदिक साखरे, ढोलकीपटू, सातवे
कराओके वापराने शास्त्रीय गायन-वादनापासून मुले दुरावतील. हार्मोनियमसह तबला, ढोलकी वादनाचे विशेषवर्ग शाळेत व्हायला हवेत.
- आनंदा सुतार, गायक, हार्मोनियमवादक, पन्हाळा
‘कराओके’चा निर्णय चांगला असून यापूर्वी संगीतकार मिळवणे अवघड व्हायचे.
- दत्तात्रय सोनटक्के, मुख्याध्यापक, मोहरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

