
शिवजयंतीनिमित्त व्याख्यान शिरगाव
‘शिवाजी महाराज संस्काराचं विद्यापीठ’
शिरगाव ः छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संस्काराचं विद्यापीठच आहे. सर्वधर्म समभावाची शिकवण देवून प्रजेला सुखी समृध्द करणारे दैवत आहेत.त्यांच्या गुणांचे आचरण आज प्रत्येकाने केले पाहिजे. असे प्रतिपादन शासननियुक्त लोककलाकार शाहिर धोंडीराम मगदून यानी केले. शिरगाव ( ता. राधानगरी) येथील शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी या विषयावर त्या व्याख्यानमालेतील पहिले पुश्प गुंफले.माजी सरपंच पांडूरंग पाटील अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत सदस्य मधूकर किरूळकर, शिवाजी डांगे. सुरेश डवरी, भिमराव मोगने, विलास पाटील, ग्रामसेवक सदाशिव पाटील, आनंदा पाटील, मारूती पाटील, रघुनाथ चरापले, अशोक पाटील, अरिजुन किरूळकर उपस्थित होते. दत्तात्रय बिडकर यांनी स्वागत केले.प्रदीप किरूळकर यांनी प्रास्ताविक केले.मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सकाळी पालखी सोहळा व शिरगाव ते किल्ले पन्हाळा दौड काडण्यात आली. रमजित चरापले, संकेत केसरकर, नागेश पाटील, अबिजित बिडकर यांच्यासह मंडलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. समीर किरूळकर यानी सुत्रसंचालन केले.सासंकृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.