राधानगरी तालुका बाह्मण संघ स्नेहमेळावा

राधानगरी तालुका बाह्मण संघ स्नेहमेळावा

02323
राधानगरी : राधानगरी तालुका ब्राह्मण समाज जागृती सेवा संघाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा झाला. या वेळी परशुराम प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करताना मान्यवर.

प्रत्येकाकडे नेतृत्वकला
आवश्‍यक : देशपांडे
राधानगरी तालुका बाह्मण संघाचा स्नेहमेळावा
राधानगरी, ता. २ : प्रत्येकाकडे नेतृत्वकला पाहिजे याच्या जोरावरच आपण संघटनेचे कार्य करू शकतो. मी संघटनेसाठी आहे यापेक्षा संघटना माझ्यासाठी आहे असे जर प्रत्येकाने ठरवले तर संघटना वाढायला वेळ लागणार नाही, असे मत संजय देशपांडे यांनी केले. ते राधानगरी येथे झालेल्या राधानगरीतील ब्राह्मण समाज जागृती सेवा संघ राधानगरीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. ॲड. अभिजित हुपरीकर अध्यक्षस्थानी होते.
परशुराम प्रतिमेचे पूजन व कलश पूजन अभिजित हुपरीकर व तेजस्विनी हुपरीकर यांच्या हस्ते झाले. अनिल पत्की, शशिकांत कुलकर्णी, सुभाष गुळवणी, आप्पासाहेब घोलकर, वसंतराव कुलकर्णी, जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रकाश गुळवणी यांनी प्रास्ताविक केले. हेमंत कुलकर्णी यांनी वार्षिक आढावा सादर केला. यावेळी विनायक गुळवणी यानी वाचनाची आवड आणि धार्मिकता या विषयावर, डॉ. जुई कुलकर्णी यांनी आधुनिक काळातील पालकत्व या विषयावर विचार मांडले. कृष्णा हुपरीकर, विनायक कुलकर्णी, प्रशांत पुजारी, अबिजित हुपरीकर यानी मनोगत व्यक्त केले. मिलींद कानेटकर, श्रीनिवास कुलकर्णी, शिवराम घोलकर, राजू शांत आदीनी संयोजन केले. पूनम देसाई यांनी सुत्रसंचालन केले. तुषार साळगावकर यांनी आभार मानले. राजू कुलकर्णी यांच्या पसायदान गायनाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com