शिरगाव उपसरपंचपदी
प्रणिता बरगे बिनविरोध

शिरगाव उपसरपंचपदी प्रणिता बरगे बिनविरोध

02979
प्रणिता बरगे
शिरगाव उपसरपंचपदी
प्रणिता बरगे बिनविरोध
शिरगाव : येथील उपसरपंचपदाच्या रिक्त जागेवर प्रणिता भीमराव बरगे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप पाटील होते. आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे येथील माजी उपसरपंच संदीप शिवाजी पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. या जागेवर बरगे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच संदीप पाटील यांनी जाहीर केले. या वेळी साधना पाटील, लता कलिकते, राजश्री पोवार, कमल पाटील, अंकुश गुरव, अंकुश चांदणे, लक्ष्मण चरापले, आक्काताई कांबळे, बापूसाहेब व्हरकट, पंडित बाबूराव बरगे, शहाजी येरुडकर, ब्रह्मदेव येरुडकर, बंडोपंत पोवार, राधानगरी तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव चरापले, ब्रह्मदेव लाड भीमराव बरगे, अर्जुन किरुळकर, भिवाजी बिडकर, शामराव बिडकर, मधुकर बिडकर उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी अशोक भांदिगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मधुकर किरुळकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com