तिनशेवेळा गिरनार पर्वतावर जाऊन दत्त पादुकांचे दर्शन स्वानुभव कथन

तिनशेवेळा गिरनार पर्वतावर जाऊन दत्त पादुकांचे दर्शन स्वानुभव कथन

03337

गुरूच नेतील भक्तांना आत्मोन्नतीकडे
प्रमोद केणे ः गिरनार स्वानुभावाचे कथन

सकाळ वृत्तसेवा

’कसबा तारळे, ता. ११ : कलियुगाचा प्रभाव वाढत आहे. आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. सामान्य माणूस होरपळून निघत आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी मनुष्यप्राणी आशेचा किरण शोधत आहेत. मग खऱ्या गुरुंचा शोध कसा घ्यावा. गुरू शोधण्यासाठी कुठे जावे लागत नाही. गुरू तुमचा शोध घेऊन तुम्हाला आत्मोन्नतीकडे घेऊन जातील, असे प्रतिपादन प्रमोद केणे यांनी केले.
त्यांनी तीनशेहून अधिक पौर्णिमेला गिरनार पर्वतावर जाऊन दत्त पादुकांचे दर्शन घेतले. येथील भोगावती नदीतीरावरील दत्त मंदिरात गिरनार प्रवासात आलेले स्वानुभव त्यांनी कथन केले.
ते म्हणाले, ‘‘आपल्याला सक्षम गुरू मिळतात. त्यावेळी ते दूर करत नाहीत; पण आपल्याकडून चूका घडल्या तर सोबतही नाहीत शिक्षा करतातच. गुरुमुळे इतिहास बदलतो. यशाच्या पोहचतो त्यावेळी स्तुती मिळते. फळाची अपेक्षा न करता मनुष्याने चांगले कर्म केल्यास आयुष्यात काही कमी पडणार नाही. मागील जन्माचे कर्म आपल्याला माहीत नाही, तरीही मागील जन्मी वाईट कर्म केले असल्यास या जन्मात चांगले कर्म करुन आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवायचे आहे. या चांगल्या कामात दत्तगुरू तुम्हाला साथ देतील. आपण करत असलेल्या साधनेवर विश्वास आणि श्रद्धा ठेवल्यास परमेश्वर आपल्याला तारून नेतो.’’ केणे स्वानुभव कथन करत होते आणि उपस्थित भाविकांना गिरनार पर्वतावर जाऊन दत्त पादुकांचे दर्शन घेतल्याचा भास होत होता. दत्तमय होऊन दत्तगुरुंनी विविध रुपांत साक्षात्कार दिला हे सांगताना त्यांचा डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
मिलिंद कानेटकर यांनी स्वागत केले. सतीश सोपारकर, दिनेश गांधी यांनी संयोजन केले. दत्तात्रय शिपेकर, दिनकर पोवार, चंद्रकांत पाटील, दिनकर पाटील, अशोक पाटील, आनंदा पाटील,अरुण पाटील, पंडित पाटील आदींसह आदिनाथ दत्त भक्त सांप्रदाय मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाआरती करून राष्ट्रगीत गायन झाल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com