मॉन्सूनपूर्व पावसात अशी घ्या खबरदारी

मॉन्सूनपूर्व पावसात अशी घ्या खबरदारी

मॉन्सूनपूर्व पावसात अशी घ्या खबरदारी

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १४ ः मे महिना सुरू झाला की मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते; याला वळीव पाऊस असेही म्हणतात. जोराचा वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह येणाऱ्या पावसामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडून जाते. सध्या मॉन्सूनपूर्व पावसाचे दिवस असून, विजांचा कडकडाटही पाहायला मिळतो अशावेळी निसर्गापुढे अतिशहाणा करून चालत नाही, अन्यथा मृत्यूशी गाठ पडते. अवकाळी पावसाबरोबर कोसळणारी वीज आणि ढगांच्या गडगडाटापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तसे नियमही घालून माहिती दिली आहे. त्यानुसार वागल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही.

अशी घ्या खबरदारी.....
* विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नका. घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा.
* उंच जागेवर जाणे टाळा.
* विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका.
* घरात असाल तर दारे-खिडक्या बंद करा.
* गाडीत असल्यास काचा बंद ठेवा.
* चार-पाच जण एकत्र असाल तर प्रत्येकामध्ये सुरक्षित अंतर ठेवा.
* मोबाईल फोनचा वापर टाळा.
* विजा चमकत असताना कुठल्याही ठिकाणी पोहणे धोकादायक असते.
* एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळली तर तातडीने प्रथमोपचारासाठी प्रयत्न करा.
* वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तरी काही धोका नसतो.
* वीज कोसळून संकटात सापडलेल्या व्यक्तीचा श्‍वासोच्छ्वास सुरळीत आहे का, हे सावधगिरीने तपासा.
* त्या व्यक्तीचा श्‍वासोच्छ्वास बंद पडला असेल तर तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्‍वासोच्छ्वास द्या.
* अंगावर जखमा-इजा झाल्या आहेत का ते पाहा.
* आशावेळी घाबरून न जाता आपत्कालीन सेवा देणाऱ्या १०७८ या क्रमांकावर संपर्क साधून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या.
* तातडीने त्या व्यक्तीला दवाखान्यात दाखल करून उपचार करण्याची दक्षता घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com