डेंगीच्या धास्तीने दुर्गमानवाडला आरोग्य पथक दाखल

डेंगीच्या धास्तीने दुर्गमानवाडला आरोग्य पथक दाखल

डेंगीच्या धास्तीने दुर्गमानवाडला आरोग्य पथक दाखल

कसबा तारळे, ता. ९ : दुर्गमानवाड येथे डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ती रोखावी, या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेट्ये यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे.
दुर्गमानवाडला विठ्ठलाई देवस्थान असल्याने येथे वर्षभर भाविकांकडून कोंबड्या-बकऱ्यांच्या जत्रा केल्या जातात. साहजिकच येथे नारळाची शेंडी, करवंट्या, कोंबड्यांची पिसे यामुळे अस्वच्छता असते. सध्या येथे काही रुग्णांत रक्तातील पेशींचे प्रमाण कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. एक व्यक्ती दुचाकीवरून पडल्याने मरण पावला. परंतु तो डेंगीसदृश आजाराने मृत्यू पावल्याचे काहींचे म्हणणे होते. त्यामुळे गावामध्ये आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले असून अनेकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याशिवाय घरोघरी भेटी देऊन पाण्याचे साठे तपासले जात असून, गावात धुराची फवारणीही केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com