कुडूत्री येथे कलाकार मानधन वाढीबाबत लोककलाकार संघाकडून आनंदोत्सव साजरा

कुडूत्री येथे कलाकार मानधन वाढीबाबत लोककलाकार संघाकडून आनंदोत्सव साजरा

3446
कुडुत्री (ता. राधानगरी) : कलाकारांना मानधन केल्याबद्दल येथे साखरपेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करताना लोककलाकार संघाचे विलासराव पाटील, रामचंद्र चौगले, विश्वास आरडे, पांडुरंग आवळकर, अनिता मगदूम आदी.
.........
कलाकार मानधनवाढीबाबत
कुडुत्रीत आनंदोत्सव साजरा

सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. ९ : राज्य शासनाने वयोवृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ केली असून, गेल्या एप्रिल महिन्याचे पाच हजार रुपये मानधन संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या वतीने कुडुत्री (ता. राधानगरी) येथे साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सांस्कृतिक विभागासह राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले.
मानधनवाढीसाठी गेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ (महाराष्ट्र राज्य) व राज्यातील इतर संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदने देण्यासह आंदोलन, उपोषणाचा इशाराही दिला होता. या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज वयोवृद्ध कलाकार मानधन योजनेमधून लाभार्थी कलाकारांना शासनाने २२५० व ३१५० रुपयांवरून सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. त्याची पूर्तता झाल्याने कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव राज्यसंपर्क प्रमुख रामचंद्र चौगले यांनी मांडला. त्यांच्यासह संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील-बेलवळेकर, महिला जिल्हाध्यक्षा अनिता मगदूम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक अशोक पोवार, तालुकाध्यक्ष पांडुरंग आवळकर, युवा राज्याध्यक्ष विश्वास आरडे, युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद माळवी, युवा तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश सुतार, जेष्ठ सदस्य मारुती सावेकर, बाजीराव पाटील, सखाराम चौगले, केरबा चौगले आदी उपस्थित होते. महेश गुरव यांनी स्वागत केले. विवेक चौगले यांनी प्रास्ताविक केले. दीपक जोहार यानी आभार मानले.
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com