सडलेले पत्रे अन् तुटलेली बाकडी

सडलेले पत्रे अन् तुटलेली बाकडी
Published on

04126, 4128
घोटवडे (ता. राधानगरी) ः येथील निवारा शेडची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हे शेड सध्या धोकादायक स्थितीत आहे. दुसऱ्या छायाचित्रात शेडवरील पत्रे गंजले असून, बसण्यासाठीचे कठडेही तुटू लागले आहेत. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
.......
सडलेले पत्रे अन् तुटलेली बाकडी

घोटवडेतील एसटीच्या निवारा शेडची स्थिती ः दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शाहूनगर, ता. १३ ः ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने गावागावांत निवारा शेड बांधली आहेत. मात्र, राधानगरी-कोल्हापूर मार्गावरील अनेक शेडची अत्यंत दुरवस्था झाली आहे. घोटवडे (ता. राधानगरी) येथील निवारा शेडची अवस्था तर दयनीय अशी झाली आहे. त्यामुळे येथे थांबायचे धोका पत्करूनच अशी स्थिती आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शेडची तातडीने दरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व खोटवडे ग्रामस्थांतून होत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वच मुख्य राज्यमार्गावरील गावागावांत एसटीची निवारा शेड आहेत; पण काही ठिकाणची शेड मोडकळीला आली आहेत. त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी एसटी महामंडळाची असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. कोल्हापूर-राधानगरी राज्य मार्गावरील घोटवडे हे बाजारपेठेचे गाव. येथील निवारा शेडची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. शेड मोडकळीस आले असून, पत्रे गंजलेले आहेत. शेडच्या वरती असणारा पत्राही सडलेला आहे. पावसाळ्यात येथे गळती लागते. त्यामुळे प्रवाशांना अन्यत्र निवारा शोधावा लागतो. प्रवाशांसाठी बसण्यासाठी बांधलेले कट्टे निखळू लागले असून, समोर गटर बांधण्यासाठी चर खोदाई केली आहे. यामुळे शेडमध्ये जाण्यासाठी पायऱ्या नसल्याने गटारीवर एक तकलादू लाकडाची फळी टाकली आहे. गटारात पाणी तुंबून राहिल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे तेथे प्रवाशांना तोंडाला रुमाल बांधून एसटीची वाट पाहावी लागते.
निवासी शेडमध्ये गेले पन्नास वर्षे हॉटेल चालविले जाते. तेथे प्रवाशांसह ग्रामस्थही चहा, नाष्ट्यासाठी जातात. त्यामुळे शेड सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, एसटी महामंडळ याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे निवारा शेडची तातडीने दुरुस्ती करून प्रवासी व ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.
...........
चौकट...
गेली ५० वर्षे आम्ही या निवारा शेडमध्ये हॉटेल व्यवसाय करतो. वडिलांच्यानंतर मीसुद्धा याच शेडमध्ये व्यवसाय करत असून, सध्या या शेडची दयनीय अवस्था झाली आहे. एसटी महामंडळाला दर महिन्याचे भाडेही दिले जाते; पण शेडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तरी एसटीच्या यंत्रणेने शेडची दुरुस्ती करावी.
- सुनील भोपळे, निवारा शेडमधील हॉटेल व्यावसायिक
.....
कोट....
घोटवडे येथील निवारा शेड नादुरुस्त असल्यामुळे आम्हाला रस्त्यावरच एस.टी. ची वाट पाहत थांबावे लागते. उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्याचा त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणचे निवारा शेड तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे.
विघ्नेश कांबळे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com