

शिरगावला गव्यांचा कळप
शिरगाव, ता. ५: येथे आज दहा ते पंधरा गव्यांचा कळप जंगलातून शेतात व तेथून पुन्हा मुख्य रस्ता पार करून जंगलात जात असल्याचे पाहिल्यावर नागरिकांची घाबरगुंडी उडा.
आणि भितीचे वातावरण निर्माण झाले.
आज सकाळी सहा वाजता जंगलातून येथील प्रा.ए.डी.चौगले यांच्या शाळेजवळुन गव्यांचा कळप रस्त्यावर आला.यावेळी सकाळी फिरायला गेलेल्या लोकांमध्ये भिती निर्माण झाली. गव्याच्या कळप आणि फिरायला गेलेल्या लोकांमधील अंतर कमी होते पण गव्यांनी रस्ता ओलांडून खाली रांग नावाच्या शेताकडे मार्ग धरला.
गव्याचा कळप आल्याची बातमी गावभर पसरल्याने रांग व ब्राह्मणाच्या शेतात आज काम करण्यासाठी जाणेच टाळले.दिवसभर या गव्यांचा कळप दरा,रांग या ठिकाणी शेतात तळ ठोकून होता.
संध्याकाळी सहा नंतर कळप जंगलात जाण्यासाठी शिरगाव - धामोड या मुख्य रस्त्यावर आले होते.यावेळी येथे अनेक वाहने ये - जा करत होती.हा गव्यांचा कळप बघून वाहनचालक थांबले
शेत शिवारात गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फोटो : शिरगाव - धामोड रस्त्यावर आलेला गव्यांचा कळप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.