
अश्लील फोटो प्रकरणी गुन्हा
अश्लील छायाचित्र प्रकरणी
एकावर गुन्हा दाखल
चंदगड, ता. ९ : तालुक्यातील एका विवाहित महिलेचे लग्नापूर्वीचे अश्लील छायाचित्र सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी येथील पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. समाधान खांडेकर (जि. उस्मानाबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
संबंधित महिलेचे लग्नापूर्वी २०१६ मध्ये संशयित खांडेकर यांच्याशी फेसबुकवरून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यावेळी त्याने एका लॉजवर काढलेले अश्लील छायाचित्र, चार दिवसांपूर्वी आपल्या बनावट इंस्टाग्राम अकाउंटवर लोड केले. हे अकाउंटही त्याने संबंधित महिलेच्या मैत्रिणीच्या नावाने बनावट काढले आहे. या अकाउंटवर छायाचित्र टाकल्यानंतर संबंधित महिलेने त्याला विचारणा केली असता त्याने तिला उलट धमकावले. माझ्यावर कोठेही तक्रार कर मी घाबरत नाही, अशा प्रकारे उद्धट उत्तरे दिली. त्यानंतर तिने येथील पोलिसात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे तपास करीत आहेत.