Tue, March 28, 2023

सुडाग्नी कादंबरीचे प्रकाशन
सुडाग्नी कादंबरीचे प्रकाशन
Published on : 15 March 2023, 1:35 am
02517
सुडाग्नी कादंबरीचे प्रकाशन
चंदगड ः कालकुंद्रीचे (ता. चंदगड) सुपुत्र व ग्रामीण लेखक कलाप्पा पाटील यांच्या सुडाग्नी कादंबरीचे प्रकाशन कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते झाले. बेळगाव मराठा मंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, अॅड. सुधीर चव्हाण, आप्पासाहेब गुरव उपस्थित होते. पाटील यांचे लेखन ग्रामीण जीवनाचा वेध घेते. ग्रामीण संस्कृतीतील बदलते संदर्भ वाचकांना विचार करायला लावतात, अशा शब्दांत खोत यांनी कौतुक केले. रवींद्र पाटील, रमजान मुल्ला, अनिल दीक्षित उपस्थित होते. दरम्यान पाटील यांचे चार कथासंग्रह प्रकाशित झाले असून सुडाग्नी कादंबरीला करवीर साहित्य परिषदेचा प्रकाशनपूर्व पुरस्कार मिळाला.