अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

02708

--------------

टेंपो - दुचाकीच्या धडकेत होसूरचा तरुण ठार

चंदगड, ता. २ ः बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी फाटा (ता. चंदगड) येथे टेंपो व दुचाकीच्या धडकेत निखिल नारायण शहापूरकर (वय २२, रा. होसूर, ता. चंदगड) हा तरुण जागीच ठार झाला. मागे बसलेला अजित नारायण पाटील (वय ३२, रा. तुर्केवाडी, ता. चंदगड) हा जखमी झाला. सोमवारी (ता. १) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
निखिल शहापूरकर हा आपली दुचाकी (एमएच ०९ एझेड ०७२५) वरुन चंदगडच्या दिशेने चालला होता. तुर्केवाडी फाट्यावर अजित पाटील याने हात दाखवून त्याला थांबवले. त्याला गाडीवर घेऊन पुढे जात असताना धुमडेवाडी फाट्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या टेंपोशी ( केए २२ बी २२६४) त्यांची धडक झाली. यात निखिल जागीच ठार झाला. तर अजित जखमी झाला. त्याला तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मृत निखिलचा भाऊ आकाश याने पोलीसात फिर्याद दिली. या प्रकरणी टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉंस्टेबल जाधव तपास करीत आहेत. निखिल उत्कृष्ट कबड्डीपटू होता. त्याच्या मागे आई, वडिल, भाऊ, दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com