२२ ग्रामपंचायत सदस्यपदाची बुधवारी आरक्षण सोडत
२२ ग्रामपंचायत सदस्यपदाची
बुधवारी आरक्षण सोडत
चंदगड ः तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्यपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २१) त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांच्या उपस्थितीत सोडत काढली जाईल. ही माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. सोडतीतून आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यासाठी पंधरा प्राधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सडेगुडवळे, कानूर खुर्द, आंबेवाडी, कोदाळी, आमरोळी, गणुचीवाडी, बुझवडे, कुरणी, माणगाव, लाकूरवाडी, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, शिरोली- सत्तेवाडी, उत्साळी, कलीवडे, मिरवेल, तांबूळवाडी, जट्टेवाडी, भोगोली, शिवनगे, कडलगे खुर्द, उमगाव या गावांमध्ये सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. संबंधित गावातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

