शिवानंद कांबळे याची एमपीएससीतून निवड

शिवानंद कांबळे याची एमपीएससीतून निवड

Published on

03164
शिवानंद कांबळे

शिवानंद कांबळेची फॉरेन्सिक लॅबमध्ये निवड
चंदगड : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील शिवानंद रुक्माणा कांबळे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेतून राजपत्रित अधिकारी वर्ग दोन पदावर निवड झाली. फॉरेन्सिक लॅबमध्ये असिस्टंट केमिकल अॅनालायझर म्हणून लवकरच तो रुजू होणार आहे. शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्याने ही परीक्षा दिली आणि यश संपादन केले. विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. के. एम. गरडकर यांचे मार्गदर्शन लाभले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.