पेन्शनर संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन

पेन्शनर संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन

Published on

03230
चंदगड ः नायब तहसिलदार अशोक पाटील यांच्याकडे निवेदन देताना पेन्शनर संघटनेचे पदाधिकारी.
----------------------------------------------------
पेन्शनर संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन
चंदगड ः इपीएफ पेन्शनर संघाच्या येथील कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार अशोक पाटील यांना दिले. सर्व इपीएफ पेन्शनरना दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन द्या, पेन्शनला महागाई भत्ता द्या, प्रवासात सवलत द्या, रेशन व संपूर्ण आरोग्य सेवा मोफत द्या, पेन्शन वाढीचा मार्ग मोकळा करा, पेन्शन फंडाचे खासगीकरण करु नका, भविष्य निर्वाह निधी कार्यालयात पुरेसे कर्मचारी नियुक्त करा, अक्यूरीयल रिपोर्टवर श्वेतपत्रिका काढा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर गोविंद गावडे, गोपाळ गावडे, अरुण होंगल, जानबा बोकडे, दत्तात्रय पताडे, शामराव अडकूरकर, विठ्ठल गावडे, पुंडलिक सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com