ग्रामीण रुग्णालयात सद्‍भावना दिवस

ग्रामीण रुग्णालयात सद्‍भावना दिवस

chd214.jpg
03256
चंदगड ः ग्रामीण रुग्णालयात सद्‍भावना शपथ डॉ. सचिन गायकवाड व कर्मचाऱ्यांनी घेतली.

ग्रामीण रुग्णालयात सद्‍भावना दिवस
चंदगड ः येथील ग्रामीण रुग्णालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्‍भावना दिवस म्हणून साजरी केली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन गायकवाड यांनी रुग्णालयात शासकीय योजनेतून केल्या जाणाऱ्या विविध उपचारांची माहिती दिली. आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हासुरे यांनी सद्‍भावना शपथ दिली. समुपदेशक विनायक देसाई यांनी राजीव गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. औषध निर्माता कृष्णदत्त परीट, अनिल नांदवडेकर यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------
‘सांगाती’ करणार गुणवंतांचा सत्कार
चंदगड ः शिनोळी (ता. चंदगड) येथील सांगाती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षी सभासदांचा व सभासदांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव केला जातो. यावर्षीही त्याचे नियोजन केले आहे. चौथी, सातवी व दहावीच्या परीक्षेत ९० टक्यांपेक्षा अधिक गुण, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह अर्ज करावा. त्याचप्रमाणे २०२२-२३ मध्ये तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराज्य पातळीवर कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश मिळवेल्या विद्यार्थ्यांनीही प्रमाणपत्रांसह अर्ज करावा. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह हलकर्णी फाटा, कोवाड, तुडये व चंदगड शाखा कार्यालयात ३० सप्टेंबरपर्यंत ते जमा करावेत असे आवाहन केले आहे.
----------------------------------------------------------------------
सह्याद्री विद्यालयात सांस्कृतिक मंडळ
चंदगड ः हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्‍घाटन जिल्हा परीषदेचे माजी बांधकाम सभापती संग्रामसिंह कुपेकर यांच्याहस्ते झाले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के. एस. माळवे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य यु. एल. पवार यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी, दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी, खेळाडू यांचा सत्कार झाला. गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व गणवेश वाटप केले. प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एन. एस. पाटील, अॅड. संतोष मळवीकर यांनी मनोगत व्यक्त केले. ज. गा.पाटील, एम. एम. तुपारे, य. बा. देसाई, प्रभाकर पाटील, आप्पाजी गावडे, भगवंत पाटील, शामराव मुरकुटे, उपसरपंच विशाल बल्लाळ, शरद गावडे, भागोजी गावडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com