सरीता नाईक यांचा सत्कार

सरीता नाईक यांचा सत्कार

03557
शिरोली ः मुख्याध्यापिका सरिता नाईक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
--------------------
सरिता नाईक यांचा सत्कार
चंदगड ः शिरोली (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता नाईक यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. नाईक यांनी विविध शालेय परीक्षेत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने हा पुरस्कार प्रदान केला. सत्काराबद्दल नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी सरपंच अशोक देसाई, जयवंतराव देसाई, बबनराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. परशराम सुभेदार यांनी प्रास्ताविक केले.
---------------------
मुगळीत प्रभारी ग्रामसेवक नियुक्त
चंदगड ः मुगळी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली. गटविकास अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आमरोळी (ता. चंदगड) येथील ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ग्रामसेवक संतोष होळ यांची बदली करून नवीन ग्रामसेवक नियुक्त करावा, अशी मागणी करुनही प्रशासनाने दखल न घेतल्याने सरपंच सोमनाथ भोगुलकर, उपसरपंच शोभा पाटील यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले होते. नवीन ग्रामसेवक मिळेपर्यंत टाळे न खोलण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, प्रशासनाने तेथे चव्हाण यांना पदभार दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com