जांबरे-इसापूर रस्त्यासाठी 
प्रयत्न करणार : हसन मुश्रीफ

जांबरे-इसापूर रस्त्यासाठी प्रयत्न करणार : हसन मुश्रीफ

जांबरे-इसापूर रस्त्यासाठी
प्रयत्न करणार : हसन मुश्रीफ
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : जांबरे-इसापूर रस्त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्‍वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या प्रश्‍नात लक्ष घालू, असे त्यांनी स्पष्ट केले. मुश्रीफ येथे एका राजकीय कार्यक्रमासाठी आले असता, सामाजिक कार्यकर्ते अजित बांदेकर यांनी या प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले.
जांबरे ते इसापूर हे अंतर केवळ सहा किलोमीटर असून, मध्यभागी दोन किलोमीटरचे अंतर वन विभागाच्या हद्दीत येते. दोन्ही बाजूने पक्के रस्ते असून, वनवे विभागाच्या हद्दीतून रस्ता झाल्यास इसापूर पारगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ केगजवाडी आधी गावांना चंदगड बाजारपेठेचे अंतर सुमारे १५ किलोमीटरने कमी होणार आहे. शिवाय गोव्याला जोडणारा हा आणखी एक जवळचा मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक दुर्गम गावांना शेतीमाल विक्रीसाठी गोव्यासारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी बांदेकर यांनी केली. त्यावर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आपण या प्रश्‍नात लक्ष घालू व मार्गी लावू, असे आश्‍वासन मुश्रीफ यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com