नुकसान भरपाई देण्यास वन खाते सकारात्मक

नुकसान भरपाई देण्यास वन खाते सकारात्मक
Published on

5296
चंदगड : शेतकऱ्यांना माहिती देताना उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील. शेजारी नितीन पाटील, संभाजीराव देसाई, लक्ष्मण गावडे, तुषार गायकवाड, शीतल पाटील.
............................
भरपाई देण्यास वन खाते सकारात्मक

उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील ः काजू बी, मेसकाठीसह पडीक जमिनींचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २७ : ‘वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे वाढते नुकसान लक्षात घेऊन यंदापासून पडिक शेतजमिनींसह काजू बी आणि मेसकाठीच्या नुकसानीलाही भरपाई देण्याबाबत वन खाते सकारात्मक आहे. या समस्येवर ठोस उपाययोजनांसाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करू,’ अशी ग्वाही कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात प्रशासन व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तुषार गायकवाड, वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी जंगलालगतच्या गावांमध्ये शेकडो एकर जमीन वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे पडिक ठेवावी लागत असल्याचे सांगत यावर कायमस्वरूपी धोरण ठरविण्याची मागणी केली. कुरणी येथील शेतकरी कृष्णा पाटील यांनी, एका हंगामात वारंवार होणाऱ्या नुकसानीसाठी दुबार भरपाई देण्याची मागणी केली.
शंकर मनवाडकर यांनी जंगलाच्या सीमारेषेवर कुंपण उभारण्याचा प्रस्ताव मांडला, तर लक्ष्मण गावडे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी झालेल्या चर्चेत तालुक्यातील नुकसानीची माहिती दिल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर धैर्यशील पाटील यांनी पडिक जमिनींचा सर्व्हे करून प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच यंदापासून काजू बी आणि मेसकाठीच्या नुकसानीच्या भरपाईचा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याचे सांगितले.
याशिवाय सौर कुंपणासाठी ७५ टक्के अनुदान, आवश्यकतेनुसार स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना, दरमहा आढावा घेण्यासाठी समन्वय समिती स्थापन करणे आणि पंतप्रधान पीक विमा योजनेत वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीस लक्ष्मण गावडे, संभाजीराव देसाई, प्रताप सूर्यवंशी, अशोक कदम, सदानंद गावडे, अशोक गडदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com