

chd33.jpg
05305
धर्मादाय आयुक्त निरीक्षकपदी
निवडीबद्दल प्रथमेश जाधव याचा सत्कार
चंदगड : कोथळी ( ता. करवीर ) येथील प्रथमेश जाधव यांची धर्मादाय आयुक्त निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात संस्थेतर्फे सत्कार झाला. प्रा. ॲड. एन. एस. पाटील म्हणाले, ‘‘धर्मादाय आयुक्त कार्यालयातील जबाबदारी संवेदनशील असून पारदर्शकता व नीतिमत्ता राखणे महत्त्वाचे आहे.’’’ प्रथमेश जाधव यांनी आपण पदाला कशी गवसणी घातली याविषयी माहिती सांगितली. संस्थाध्यक्ष जी. एस. पाटील, डॉ. पी. आर. पाटील, इंजि. एम. एम. तुपारे, प्रा. आर. पी. पाटील, एल. डी. कांबळे, आनंद सुतार, वामन सडेकर, शामराव मुरकुटे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.