पैजारवाडीत सद्गुरु चिले महाराज भंडारा मोहोत्सव

पैजारवाडीत सद्गुरु चिले महाराज भंडारा मोहोत्सव

00591
सद्‍गुरू चिले महाराज

सद्‍गुरू चिले महाराज यांचा
पैजारवाडीत भंडारा महोत्सव
देवाळे, ता. २९ : परमपूज्य सद्‍गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे ३९ वा सद्‍गुरू चिले महाराज भंडारा महोत्सव १ ते ८ मे या काळात होत आहे. यानिमित्त पैजारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, ‘‘भंडारा महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी काकड आरती व ज्ञानेश्‍वरी वाचन सुरू होईल. महोत्सव काळात प्रवचन, कीर्तन, भक्तिगीत गायन असे कार्यक्रम होणार आहेत. यात पैजारवाडी, आवळी, नावली, बोंगेवाडी, बोरिवडे, सातवे, सावर्डे, सोनवडे, बांबवडे, सरूड, सावे, साळशी, भोसलेवाडी, गमेवाडी, पवारवाडी, मानकरवाडी, घुंगूर, घुंगूरवाडी, सावरेवाडी, गवळवाडी, बांदिवडे, पिशवी, परखंदळे, तळपवाडी, सावर्डे बुद्रुक, सुपात्रे, खुटाळवाडी व भाडळे गावातील भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. ७ मे रोजी भंडारा महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी ग्रामप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. जगन्नाथ पाटील, दत्तात्रेय खालंगारे, विजय सुरवसे, अंतेश्‍वर बिराजदार या भंडारा महोत्सवासाठी सहकार्य करत आहेत. ८ मे रोजी सकाळी नऊ वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्‍वर नामदास महाराज पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यावेळी भंडारा उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.’’ यावेळी विश्‍वस्त बाबुराव गराडे, प्रवीण पारिख, चंद्रप्रकाश पाटील, विनायक जाधव, जयसिंग पारखे, बी. के. घोसाळकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com